कुकुरमुंडे संस्थानची पायीवारी यावर्षीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:24+5:302021-06-16T04:47:24+5:30

या संस्थानची पायी आषाढीवारी अनेक दशकांपासून अव्याहतपणे सुरू आहे. वारी परंपरा खंडित न होता गतवर्षीप्रमाणे यंदाही वाहनातून दिंडी मोजक्या ...

The foundation of Kukurmunde Sansthan was also canceled this year | कुकुरमुंडे संस्थानची पायीवारी यावर्षीही रद्द

कुकुरमुंडे संस्थानची पायीवारी यावर्षीही रद्द

या संस्थानची पायी आषाढीवारी अनेक दशकांपासून अव्याहतपणे सुरू आहे. वारी परंपरा खंडित न होता गतवर्षीप्रमाणे यंदाही वाहनातून दिंडी मोजक्या वारकऱ्यांसह जाणार असल्याचे संस्थानचे गादी पुरुष ह.भ.प. उद्धव महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे. संस्थानची यंदाची ही १९५ वी पंढरी वारी आहे, तर उद्धव महाराज यांची ही ३७ वी वारी होणार आहे. कुकुरमुंडे या संस्थानच्या वाहनास गेल्यावर्षीप्रमाणे पंढरी प्रवेशास शासन मान्यता मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासन निर्णय जाहीर करताना शासनातर्फे ज्या तीन संस्थानला शासकीय पूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान दिला आहे त्यात या संस्थानला विशेष मान मिळाला आहे. या पंढरी वारीचे ३० जूनच्या दरम्यान वाहनातून प्रस्थान होईल, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: The foundation of Kukurmunde Sansthan was also canceled this year