समता शाळेतील पाच शिक्षक पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:00+5:302021-03-06T04:34:00+5:30

समता शाळा सात दिवसांसाठी बंद चितोडरोडवरील समता शाळेतील पाच शिक्षकांचे अहवाल गुरुवारी कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. खबरदारी म्हणून शाळा ...

Five teachers in Samata School are positive | समता शाळेतील पाच शिक्षक पाॅझिटिव्ह

समता शाळेतील पाच शिक्षक पाॅझिटिव्ह

Next

समता शाळा सात दिवसांसाठी बंद

चितोडरोडवरील समता शाळेतील पाच शिक्षकांचे अहवाल गुरुवारी कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. खबरदारी म्हणून शाळा सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. तर समता शाळा सात दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोरोना बाधित शिक्षकांच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली आहे. त्यात एकालाही बाधा झालेली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. टेस्टप्रसंगी नगरसेवक अमोल मासुळे, समता शाळेचे चेअरमन मधुकर शिरसाठ, मुख्याध्यापिका हेमलता पाटील, अमोल शिंदे, मिलिंद पाटील, आकीब शाह, बाळासाहेब भराडे, मोतीराम बागुल आदी उपस्थित होते.

शाळा सॅनिटायझेशनच्या वेळी मनपा सहायक निरीक्षक राजेश वसावे, शशिकांत जाधव, संजय चांगरे, दत्तात्रय माळींचे सहकार्य लाभले. महानगरात आतापर्यंत १०१३९ जणांना काेरोनाचा लागण झाली आहे. तर त्यात २१२ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढू नये. यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे. शहरातील आग्रारोड पाच कंदील, पारोळा रोड, कराचीवाला खुंट, देवपूर भाजीपाला बाजार अशा परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी असते. याच गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी मनपा, पोलिस प्रशासनाकडून पथक नियुक्त करण्यात आले आहे.

शाळांना लागले ग्रहण

कोरोना पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शाळा सुरू झाल्यात. मात्र कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने एकाच दिवसात जयहिंद महाविद्यालयातील १५ शिक्षकांना बाधा झाली होती. त्यानंतर कमलाबाई कन्या विद्यालय, चितळे विद्यालयानंतर आता समता शाळेतील शिक्षकाचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे.

Web Title: Five teachers in Samata School are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.