शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बोराडीत आढळला कोरोनाचा पहिला रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:19 IST

सहा दिवसाचा लॉकडाऊन : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांना कोविड सेंटरमध्ये पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर/बोराडी : शहरात आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत जात असून शुक्रवार दुपारपर्यंत तब्बल ९० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरूवारी रात्री उशिरा देखील ३ रुग्ण आढळले असून त्यात शहरात २ तर एक बोराडीला आढळून आला आहे़ बोराडी पाच दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.बोराडीत पाच दिवस फक्त मेडिकल दवाखाने व अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. जे दुकानदार सुरू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना बाहेर किंवा बाहेरील लोकांना कंटेन्मेंट झोन प्रवेश देऊ नये. कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना बाहेर येता येणार नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांचे एक ते दोन कर्मचारी नेमून दिले आहे. ते नागरिकांना वस्तू आणण्यासाठी मदत करतील. कुठलाही प्रकारचा कामचुकारपणा केल्यास पहिला गुन्हा ग्रामविकास अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात येईल अशी तंबी दिली.बोराडी येथे गुरुरवारी रात्री ११.३० वाजेला २४ वर्षीय युवक व त्याच्या संपकार्तील इतर ५ लोकांना शिंगावे क्वारंटाईन सेंटर येथे पाठविण्यात आले. उपसरपंच राहुल रंधे यांनी रात्रीपासून ग्रामपंचायतीमार्फत गावातील वस्त्यांमध्ये सॅनीटायझर फवारणी व धुरळणी केली. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्या गल्लीतील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.शुक्रवारी तहसीलदार आबा महाजन तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी गटविकास अधिकारी रेदा पावरा, सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा देशमुख यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या गल्लीतील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्यात.

टॅग्स :Dhuleधुळे