वारूड येथे खळ्यांना आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:25+5:302021-03-31T04:36:25+5:30

मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या गावातील पूर्वेस ग्रामस्थांना धूर निघत असल्याचे दिसून आले. काही ग्रामस्थांनी धुर निघाल्याच्या दिशेने धाव घेतली ...

Fire at Warud, loss of millions | वारूड येथे खळ्यांना आग, लाखोंचे नुकसान

वारूड येथे खळ्यांना आग, लाखोंचे नुकसान

मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या गावातील पूर्वेस ग्रामस्थांना धूर निघत असल्याचे दिसून आले. काही ग्रामस्थांनी धुर निघाल्याच्या दिशेने धाव घेतली असता, त्या ठिकाणी खळ्यांना आग लागल्याचे दिसून आले. आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. क्षणार्धात जवळपास आठते दहा खळे जळून खाक झाले. या खळ्यांमध्ये चारा भरलेला होता. तो जळून खाक झाला. तसेच ग्रामस्थांनी खळ्यातील साहित्य बाहेर नेण्याचाही प्रयत्न केला होता. आग आटोक्यात येत नसल्याचे बघून ग्रामस्थांनी शिंदखेडा येथील अग्निशामक दलास पाचारण केले. त्यानंतर दोंडाईचा, शिरपुर,धुळे येथुनही अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले आग विझवण्यास २ ते३ तासाचा कालावधी लागला.या आगीत गावातील सुरेश देवराम सोनवणे, आसाराम देवराम सोनवणे, लोटन मोतीराम पाटील, पोपट सोनू पाटील, दिलीप पंडित बोरसे, हिम्मत पंडित बोरसे, घनश्याम बाबुराव बोरसे, विठ्ठल लोंढु खैरनार, दिलीप बुधा राणे, धनसिंग जयराम पाटील यांच्या खळ्यांचे नुकसान झालेले आहेत सदर यांच्या खेळामध्ये दादरी चे चारा , चाऱ्याची कुट्टी,दादरीचे भरलेले पोते, शेती उपयोगी अवजारे, खताच्या गोण्या तसेच संसारोपयोगी साहित्य होते, ते जळून खाक झाले. आगीत सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवीत हानी झालेली नाही. यावेळी नथू वारुडे,ललित वारूडे, रविराज भामरे तसेच ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते आगीची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे तसेच वारूड चे तलाठी एच एम लोंढे,ग्रामसेवक गणेश पाटील घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Fire at Warud, loss of millions