शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आला ...

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशान्वये सायंकाळी ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती एक हजार रुपयांच्या (प्रतिव्यक्ती) दंडास पात्र राहील, असा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी काढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्चपासून लागू असून, अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून, जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणणे आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहेत. राज्य शासनाच्या २७ मार्च रोजीच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. ते असे- मुखपट्टी/ मास्कचा वापर : सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे सार्वजनिक व खासगी वाहनातून प्रवास करताना मुखपट्टी/ मास्क वापरणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर राखणे : नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटांचे अंतर राखणे बंधनकारक राहील. व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. अशा आस्थापनांमध्ये एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक/ व्यक्ती असणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध संबंधित प्राधिकरणाने कायदे व नियमाद्वारे निश्चित केलेल्या दंडाची आकारणी करावी. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू, सुपारी आदी खाण्यास/ पिण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिला आहे.