खापर येथे मुलाकडून बापाचा खून

By Admin | Updated: March 7, 2017 00:26 IST2017-03-07T00:26:48+5:302017-03-07T00:26:48+5:30

खळबळ : यात्रेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून केले ठार

Father's blood in Khapar | खापर येथे मुलाकडून बापाचा खून

खापर येथे मुलाकडून बापाचा खून

अक्कलकुवा : यात्रेला  जाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना खापर येथील कोराई भागातील भाटय़ाफळी येथे             सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़  रविवारपासून खापर येथे वार्षिक यात्रोत्सव सुरू आह़े
यात सहभागी होण्यासाठी भाटय़ाफळी भागातील रहिवासी योगेश रवींद्र पाडवी याने वडील रवींद्र भरत पाडवी (52) यांच्याकडून पैसे मागितल़े
  रवींद्र यांनी त्याला पैसे दिले नाहीत़ याचा राग आल्याने योगेश पाडवी याने घरातील लाकडी मुसळ रवींद्रच्या डोक्यात मारल़े
 मुसळाच्या प्रहारामुळे रवींद्र हे  घटनास्थळीच गतप्राण झाल़े  परिसरातील नागरिकांनी खापर औटपोस्टला ही माहिती दिल्यानंतर संशयित आरोपी योगेश यास ताब्यात घेण्यात आल़े
 योगेश याचा लहान भाऊ  किसन पाडवी याने दिलेल्या फिर्यादीवरून योगेश याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आह़े
    (वार्ताहर)

Web Title: Father's blood in Khapar