शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:02 IST

महापालिका । विशेष महासभेत होणार निर्णय

धुळे : सर्वासाठी घरे २०२० या धोरणाची प्रभावी अंमलबजासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्राच्या खाजगी जमिनीवरील अतिक्रमन धारकांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी महापालिकेकडून तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे़महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फेत ११ सप्टेंबर २०१९ अन्वये शासन निर्णय पारीत झालेला आहे़ त्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मालकीच्या अखत्यारित जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करून अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्याबाबत शासनाने १७ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आदेशान्वये पट्टवाटपाच्या संदर्भात मार्गदर्शन सुचना निश्चित केल्या आहेत़ त्यानुसार मनपा स्तरावरून कार्यवाही सुरु केल्या आहे़ त्यासाठी महापालिकेची विशेष सभेत निर्णय घेतला जाणार आहे़घोषीत, अघोषीत झोपडपट्या लाभसर्वसामान्य नागरिकाचे घरकुलाचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी १७ नोव्हेबर २०१८ च्या केंद्र शासनच्या निर्णयानुसार सरकारी जागेवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार ग्रामपंचायत व महापालिका हद्दीतील अतिक्रमण धारकांची माहीती जमा करण्यासाठी खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे़ सध्या शहरात ३९ शासकीय जागेवर (घोषित झोपड्या) आहेत़ तर १९ अघोषित झोपड्या, ७ फुटपाथवरील झोपडपट्या, ६० कॉलनी, नगर व विविध भागातील झोपडपट्या आहेत़सर्व्हेनंतर मिळणार हक्कसर्र्वांसाठी घरे २०२० पर्यत सर्व बेघर कुुटुंबांना घर देण्याची महत्वकांशी मोहिम हाती घेण्यात आली आहे़ शहरातील घोषित, अघोषित, गावठाण जागा तसेच अतिक्रमीत जागेची ड्रोनव्दारे मोजणी केली जात आहे़नियमाकुल जागेवरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी मंगळवारी १७ विशेष सभा आयोजित केली आहे़ सभेत शहरातील बेघरांना घरकुलाचा लाभ मिळवुन देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे़ घरकुला बाबत चर्चा हाऊन निर्णय घेतला जाणार आहे़ अशी माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे