शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उभंड येथील शौचालय बांधकामात साडेपंधरा लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 22:12 IST

माजी महिला सरपंचासह विद्यमान सरपंच व ग्रामसेवकाविरोधात गुन्हा

धुळे : साक्री तालुक्यातील उभंड येथील ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या २९१ वैयक्तिक शौचालयाच्या कामांत केवळ १६३ शौचालयांची कामे करीत उर्वरीत १२८ वैयक्तिक शौचालयांची कामे न करता १५ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी साक्री पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जगदीश पांडूरंग खाडे (४८) यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार उभंडचा ग्रामसेवक, माजी महिला सरपंच, विद्यमान सरपंच आणि माजी सरपंचांचा पती अशा चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.साक्री तालुक्यातील उभंड ग्रामपंचायतीने २०१५ ते ७ जानेवारी २०२१ दरम्यान २९१ वैयक्तिक शौचालयांची कामे हाती घेतल्याचे दिसते. यात १६३ शौचालयांची कामे झाल्याचे दिसते. मात्र उर्वरीत १२८ शौचालयांची कामे झाल्याचे दिसून येत नाही. शिवाय १० मार्च २०१८ नंतरचे वैयक्तिक शौचालयाचे (एसबीएम) दप्तरही चौकशीसाठी सादर केलेले नाहीत. यामुळे उभंडचे ग्रामसेवक रविंद्र यशवंत पाटील (रा. स्वामी सोसायटी, साक्री) सरपंच नवल धवळू देवरे (रा. उभंड ता. साक्री), तत्कालिन सरपंच विद्याबाई संजय पाटील यांनी १२८ शौचालयांचे काम दाखवून प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे एकूण १५ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. तसेच तत्कालिन सरपंच विद्याबाई पाटील यांचे पती संजय चिंधा पाटील यांच्या नावे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक शौचालयाचे काम मंजूर नसताना त्यांचे नावे १२ हजार रुपयांचा धनादेश वटविला गेल्याचे दिसून येत आहे. संबंधितांनी एकूण १५ लाख ४८ हजार रुपयांचा अपहार केल्याने ग्रामसेवक रविंद्र पाटील, सरपंच नवल देवरे, तत्कालिन सरपंच विद्याबाई पाटील, त्यांचा पती संजय पाटील या चार संशयितांविरुध्द भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे