शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे प्रश्न तातडीने सोडवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीची संयुक्त बैठक आयोजित ...

आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीची संयुक्त बैठक आयोजित केली होती, त्यात वरील सूचना दिल्या.

वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना वारंवार विजेचे प्रश्‍न भेडसावत असतात. त्यामुळे शेती उत्पन्नाचे नुकसान होत असते. शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्‍न सुटावेत म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची गतिशीलता वाढवावी. धुळे तालुक्यात मंजूर असलेल्या ५० नवीन ट्रान्स्फाॅर्मरची माहिती देण्याच्या सूचना आ.पाटील यांनी केल्या, त्यानुसार कार्यकारी अभियंता डी.डी.भामरे यांनी सांगितले की, ५० ट्रान्स्फाॅर्मर प्राप्त झाले असून त्यापैकी काही ट्रान्स्फाॅर्मर बसविण्यात आले आहेत.तर उर्वरित अतिरिक्त विजेचा दाब आहे त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर ट्रान्स्फाॅर्मर व स्ट्रीट लाईटची कामांची त्वरित निविदा काढून प्राधान्याने कामे सुरु करण्याच्या सूचना दिल्या.तसेच ओ.टी.एस.योजनेंतर्गत आदिवासी वस्तीतील वीजपुरठ्याच्या कामांची निविदा काढून सदर कामे तत्काळ सुरु करण्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी नवीन ट्रान्स्फाॅर्मर तसेच विजेचे पोल बसविण्याची मागणी केली. बाबरे येथे आदिवासी वस्ती अंधारात होती म्हणून तेथे वीजपुरवठा व्हावा म्हणून एकूण १५ लक्ष ९४ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून हे काम लवकरच सुरु होईल.बैठकीला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत ग्रामीणचे विभागीय कार्यकारी अभियंता डी.डी. भामरे, कार्यकारी अभियंता एन.बी. गांगो, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हाटकर,कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी-विक्री चेअरमन लहू पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान पाटील, योगेश चव्हाण, उपकार्यकारी अभियंता, आर. एस. खिरवाडकर,रितेश पाटील, साहेबराव खैरनार, पंढरीनाथ पाटील, के.डी.पाटील, संतोष राजपूत, सोमनाथ बागुल, नेर सरपंच गायत्री जयस्वाल,शशिकांत रवंदळे,सागर पाटील, संदीप पाटील, प्रल्हाद मराठे आदी उपस्थित होते.