शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीजवळ स्पिरीटचे आठ ड्रम शिताफीने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:19 IST

शिरपूर : १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, चालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक पहाटेच्या सुमारास गस्त घालीत असतांना सांगवी गावाजवळ गस्तच्या गाडीला पाहताच स्पिरीट वाहून नेणाºया वाहन चालकाने वाहन सोडून पळ काढल्याची घटना घडली़ वाहनासह १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे येथील निरीक्षक व्ही़ बी़ पवार, दुय्यम निरीक्षक राजेश जाधव, एस़ पी़ कुटे, शांतीलाल देवरे, गोरख पाटील, केतन जाधव, रामचंद्र चौरे यांचे पथक महामार्गावर गस्त घालीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सांगवी शिवारातील आंबा-खामखेडा रस्त्यावर संशयित वाहन क्रमांक एमएच १८ एए ५०२ जात होते़ या वाहनाचा गस्तीवरील पथक पाठलाग करत असतांना संबंधित चालकाला संशय आल्यामुळे त्याने वाहन थांबवून पळ काढला़ त्यामुळे पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना स्पिरीटचे (शुध्द मद्यार्क) २०० लिटर क्षमतेचे ८ प्लॉस्टिक ड्रम पूर्णपणे भरलेले व ७ ड्रम २०० लिटर क्षमतेचे रिकामे स्पिरीट वासाचे असा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल विनापरवाना वाहतूक करीत असतांना मिळून आला़ ९५ हजार रूपयांचे स्पिरीट व ९ लाख ७५ हजार रूपयांच्या वाहनासह  एकूण १० लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी