कोरोना काळात तब्बल साडेचार लाखांच्या................. दंडासह गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST2021-03-24T04:33:56+5:302021-03-24T04:33:56+5:30

कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नियमांच्या अंमलबजावणीची सर्वाधिक मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. गेल्या ...

During the Corona period, a case was registered with a fine of Rs | कोरोना काळात तब्बल साडेचार लाखांच्या................. दंडासह गुन्हे दाखल

कोरोना काळात तब्बल साडेचार लाखांच्या................. दंडासह गुन्हे दाखल

कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नियमांच्या अंमलबजावणीची सर्वाधिक मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. गेल्या वर्षात पोलिसांनी चोवीस तास रस्त्यावर खडा पहारा देत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मागील वर्षी नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावर्षी मात्र दंडात्मक कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडापासून कोरोना बाधितांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सुरवातीच्या टप्प्यात महानगरात सर्वाधिक बाधित आढळून आले होते. त्यानंतर ग्रामीण भागात बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा नव्याने उद्रेक वाढल्याने पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, गर्दी करणे आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कडक अंमलबजावणीमुळे नियम तोडणाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे.

मास्क न वापरणाऱ्या ६९ हजार ९७२ जणांवर कारवाई

घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरणाऱ्या ६९ हजार ९७२ जणांवर पोलिसांनी कारवाई करीत एकूण ८६ लाख ३३ हजार ७०० रुपयांचा.......................... दंड ठोठावला आहे.

पिचकारी बहाद्दरांनाही दणका

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १ हजार ६३१ जणांकडून २ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्या १ हजार ९०६ जणांवर पोलिसांनी कारवाई करीत २ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महापालिकेकडून नियमांची कडक अंमलबजावणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. त्यासाठी पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली.

Web Title: During the Corona period, a case was registered with a fine of Rs