शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

धुळे जिल्ह्यात पावसामुळे मुग, उडीदची खरेदी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:29 AM

खरेदीच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्के असणे गरजेचे

आॅनलाइन लोकमतधुळे :नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमी भावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे या धान्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने, मुग,उडीदची अद्याप खरेदी सुरू झालेली नाही, अशी माहिती जिल्हा मार्केटींग कार्यालयातून देण्यात आली.शेतकऱ्यांच्या मालाला हभी भाव मिळावा यासाठी २०१९-२० या हंगामासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात धुळे, शिरपूर व दोंडाईचा या तीन ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. शासनाने यावर्षी मुगाला ७ हजार ५०, उडीदला ५७०० तर सोयाबीनला ३७१० रूपये प्रति क्विंटल भाव जाहीर केलेला आहे.नोंदणी सुरू होऊन जवळपास १५-२० दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप मुग,उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही.मुग, उडीद, सोयाबीन खरेदी न होण्यास सतत सुरू असलेला पावसाचे कारण आहे. यावर्षी सुरवातीपासूनच पाऊस चांगला असल्याने, मुग, उडीदाचे उत्पन्न चांगले आलेले आहे.हमी भावाने मुग,उडीद खरेदी करण्यासाठी त्यात आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्के असणे गरजेचे आहे. मात्र यावर्षी संततधार सुरू असल्याने, मुग, उडीदामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या धान्याची शासकीय केंद्रावर खरेदी सुरू होऊ शकलेली नाही, अशी माहिती देण्यात आली.गेल्यावर्षीही जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली होती. त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी सुरू असून शेतकरी आता उघडीपची वाट पहात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे