शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात पावसामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:00 IST

अद्याप खरिपाची पिके पूर्णपणे काढली नाही, जमिनीत ओलावा असल्याने मशागतही होऊ शकत नाही

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात यावर्षी होत असलेल्या परतीच्या पावसामुळे रब्बी क्षेत्राच्या पेरण्यांना अद्याप सुरूवात होऊ शकलेली नाही. खरीपाच्या पिकांची काढणी झाल्यानंतर २५ नोव्हेंबरपासून पेरण्यांना सुरूवात होऊ शकेल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. दरम्यान पावसामुळे रब्बीचे क्षेत्र दुप्पट वाढणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.यावर्षी जून महिना वगळता पावसाळ्याच्या सर्वच नक्षत्रांमध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. सुरूवातीला उत्पन्नही चांगले होते. ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपला तरी संपूर्ण आॅक्टोबर महिना अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच, मात्र शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. कडक उन्हच पडत नसल्याने, शेतात वाफही होऊ शकली नाही. काही ठिकाणी तर पिकांपेक्षा तणच अधिक वाढलेले आहे.जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात मुख्यत: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, मका, रब्बी सूर्यफूल य यांचे पिक घेतले जात असते. या पिकांची पेरणी प्रामुख्याने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने, शेतात ओलावा कायम आहे. अजून खरिपाची पीके शेतात उभी आहेत. पावसामुळे पिकांची कापणीही होऊ शकत नाही. या पिकांची कापणी झाल्यानंतरच रब्बीसाठी शेतकऱ्यांना शेताची मशागत करता येणार आहे. त्यानंतर रब्बीच्या पेरण्या सुरू होतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे. जोपर्यंत शेतातील पाणी पूर्णपणे आटत नाही, तोपर्यंत शेतीची कामे करता येणे शक्यच नाही.जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या होण्याला नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उगविण्याची शक्यता आहे. या पेरण्या किमान डिसेंबर अखेरपर्यंत होवू शकतील. पावसामुळे यावर्षी रब्बीच्या पेरण्यांना किमान तीन आठवड्यांचा उशिर झालेला आहे.बियाण्यांची उपलब्धतायावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढण्याचे गृहीत धरून कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले असून, बियाणे उपलब्ध झालेले आहे. तसेच खतेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. आता फक्त पावसाने उघडीप घेण्याची प्रतीक्षा केली जात असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान खरीपात अ‍ेपक्षित उत्पन्न हाती न आल्याने, अनेक शेतकऱ्यांकडे रब्बीच्या लागवडीसाठी पैसा नाही. त्यामुळे अशा शेतकºयांना कर्ज काढूनच रब्बीची पेरणी करावी लागणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती