शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅग बाबत चालकांमध्ये संभ्रम कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:40 IST

५५ टक्के वाहन चालक झालेत गो फास्ट

ठळक मुद्देसरकारी वाहनांची बसविले टॅगतिसऱ्यांदा ३१ जानेवारीपर्यत मुदत दिली अनेक यासंदर्भात अनभिज्ञफास्टॅग बाबत पाहिजे तेवढी जनजागृती झाली नसल्याने ते गोंधळ

चंद्रकांत सोनार ।धुळे : टोल नाक्यावरील वाहनांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी तसेच वाहनांचा वेग वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच टोल नाक्यावर फास्टॅगची सुविधा सुरू केली आहे़ आतापर्यत मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक करणाऱ्या धुळ्यातील स्थानिक ५५ टक्के वाहन चालक या प्रणालीद्वारे प्रवास करीत आहे़ तरीसुद्धा अद्याप वाहन चालकांना फास्टॅग बाबत पाहिजे तेवढी जनजागृती झाली नसल्याने ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसतात.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यात १ डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली लागू केली होती़ मात्र बहूसंख्य टोल नाक्यावरील यंत्रणेचे कामकाज पूर्ण नसल्याने १५ डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती़ दरम्यान, यासंदर्भात धुळे शहरातील अवधान येथील टोल नाक्यास ‘लोकमत’च्या टीमने प्रत्यक्ष भेट दिली असता त्याठिकाणी फास्टॅगला मुदतवाढ दिल्याने दोन दिवसापासून लागणारी वाहनांची रांग दिसली नाही. मात्र नाक्यावर जी वाहने उभी होती. त्यापैकी केवळ सुमारे ५० टक्के वाहनेच फस्टॅगचा वापर करतांना दिसून आली. उर्वरित ५० टक्के वाहने मात्र रोख रक्कम जमा करुन जातांना दिसली.अनेक यासंदर्भात अनभिज्ञरोख रक्कम भरणाºया वाहनांमध्ये ट्रक चालकांचा अधिक समावेश होता. त्यापैकी काही चालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी फस्टॅग बाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचे कबूल केले. यामुळे दोन दिवसात खूप त्रासही झाल्याचे मान्य केले. मुदतवाढ मिळाल्याने आपण एक महिन्यात याबाबत माहिती घेऊ असेही काहींनी सांगितले.रिचार्जच्या बाबत संभ्रमावस्थाकाही कार चालकांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, फस्टॅग बाबत माहिती आहे. पण ते रिचार्ज कुठून करायचे तसेच त्याचे पेमेंट कसे करावे, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे यापासून लांबच रहावे, असे वाटते, अशी प्रतिक्रीया पुणे येथून आलेल्या श्रीकांत पटनायक यांनी दिली.सरकारी वाहनांची बसविले टॅगशासनाने सरकारी तसेच खाजगी वाहनांना फास्टॅगची सक्ती केली आहे़ त्यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मनपा, जिल्हा पोलीस, राज्य परिवहन महामंडळ अशा विभागांना पत्राव्दारे फास्टॅग लावण्याचे आदेश दिले आहे़ त्यानुसार बहूसंख्य वाहनांना मुदतीत फास्टॅग लावण्यात आले आहे़ मात्र बहूसंख्य खाजगी वाहनांना अद्याप फास्टॅग लावण्यात आलेले नाही़ त्यामुळे १५ डिसेंबर रोजी सोनगीर, अवधान टोलनाल्यावर ही यंत्रणेची चाचणी घेण्यात आली होती़ मात्र लेनचे नियोजन नसल्याने टोलनाल्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ फास्टॅग लावण्यासाठी शासनाने तिसऱ्यांदा ३१ जानेवारीपर्यत मुदत दिली आहे़ आहे़ त्यासाठी ३१ जानेवारीपर्यत टोल नाक्यावरील कॅश काऊंटर सुरू ठेवले आहे़ वाहनाला फास्टॅग लावण्यासोबतच फास्टॅग वॉलेटमध्ये रक्कम ठेवणे गरजेचे आहे़

टॅग्स :Dhuleधुळे