शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत की संतान’ला नाट्य भूषण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 22:06 IST

आंतरराष्ट्रीय शास्त्रीय व लोकनृत्य महोत्सव : नाट्याला नरेंद्र वडगावकर यांचे दिग्दर्शन

धुळे : येथील राष्ट्रीय युवा योजना (दिल्ली) चे राष्ट्रीय संघटक नरेंद्र वडगावकर (धुळे) यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘भारत कि संतान’ या नाट्याला तारा आर्टस् अ‍ॅकॅडमी हैद्राबाद या सांस्कृतिक संस्थेने ‘नाट्य भूषण पुरस्कार’ देवून सन्मानीत करण्यात आले.तारा अ‍ॅकॅडमी हैैद्राबाद (तेलंगना) या सांस्कृतिक संस्थेच्यावतीेने एस.व्ही. विश्वविद्यालय, तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे नुकतेच दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शास्त्रीय व लोकनृत्य महोत्सव २०२०’चे आयोजन करण्यात आले होते.महोत्सव उद्घाटनप्रसंगी रायुयोचे अध्यक्ष, ज्येष्ठ गांधी विचारक डॉ.एस.एन. सुब्बारावजी, हैद्राबाद विभाग लायन्स क्लबचे अध्यक्ष विजयकुमार, तेलंगनाचे कमिश्नर वरमनकृष्णा मोहनराव, तेलंगाना साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्रीनंदिनी शिवारेड्डी, गोविंद स्वामी कॉलेजचे प्राचार्य रमेश गारु आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी नरेंद्र वडगावकर यांना तारा आर्ट अ‍ॅकॅडमी या संस्थेचे ‘नाट्यू भूषण पुरस्कार’ शाल व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. नरेंद्र वडगावकर यांच्या दिग्दर्शीत ‘भारत की संतान’ हा कार्यक्रम सिंगामपूर, लंडन, तुर्की, बांगलादेश, श्रीलंका व संपूर्ण भारतात हा कार्यक्रम सादर करत आहेत. या महोत्सवात नरेंद्र वडगावकर यांनी तिरुपती येथील गोविंदस्वामी महाविद्यालयातील युवक-युवती यांच्यावतीने ‘भारत की संतान’ कार्यक्रम सुंदर सादर केला.तारा आर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष एस.राजेश व महोत्सव समन्वयक श्रीनिवास यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. विविध राज्यातील युवा कलाकारांनी शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य सादर केली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते़नरेंद्र वडगावकर १९९१ वर्षापासून राष्ट्रीय युवा योजना या सामाजिक संस्थेमध्ये सामाजिक कार्य करत आहे. रायुयोच्या वतीने नरेंद्र वडगावकर यांच्या दिग्दर्शीत ‘भारत की संतान’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय १८ बहुभाषा, वेशभूषा व संस्कृति आधारीत एकात्मताचा संदेशाचा कार्यक्रम सादर करतात.

टॅग्स :Dhuleधुळे