शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर परिसरात दुबार पेरणींना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST

हवामान विभागाने यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मृग नक्षत्रात पावसाचेदेखील जोरदार ...

हवामान विभागाने यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मृग नक्षत्रात पावसाचेदेखील जोरदार येथे आगमन झाले. या पावसाच्या भरवशावरच शेतकर्‍यांनी खरिपातील पेरणीची कामे व कोरडवाहू कापूस लागवड पूर्ण केली. मात्र तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे केलेल्या पेरण्या वाया गेल्या. सध्या येथील शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या कामांना सामोरे जावे लागत आहे. तर कापसाचीदेखील हीच गत झाल्यामुळे नव्याने कापूस लागवड शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच दुबार पेरणीमुळे येथील शेतकरी भांडवलासाठी आर्थिक चणचणीत सापडला आहे.

प्रदीर्घ खंडानंतर सध्या येथे तोकड्या स्वरुपाचा रिमझिम पाऊस होत आहे. गावात पाऊस तर शेतशिवारात ऊन, एक शिवार सोडून दुसऱ्या शिवारात पाऊस होत आहे. पावसाचे सातत्य राहिले तर ही पेरणी वाढीस लागेल अन्यथा हातातील भागभांडवल व बियाणे सुटून पदरी पुन्हा निराशा पडणार आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावले आहेत. यावर्षी येथील मृगाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. मूग, उडीद, ज्वारी, बाजरी ही कमी पाण्याची व कमी दिवसांची पिके असून, यासह भुईमूग पिकाचीदेखील काही ठिकाणी शेतकरी पेरणी करताना दिसून येत आहे. मात्र लांबलेल्या पावसामुळे येथे भुईमुगाचे क्षेत्रफळ घटले आहे, तर बाजरीचे क्षेत्रफळ वाढले आहे. पुढच्या आठवड्यात कांदा लागवडीस सुरुवात होणार आहे. येथे मिरचीचीही लागवड करण्यात येते.

यावर्षी मालपूर येथे मजुरीचे दर वाढले असून, निंदणीसाठी दिवसाला एका माणसाची मजुरी दोनशे रुपये आहे. कांदा लागवड, खत लावणे दोनशे रुपये, तर रोजच्या मजुरीचे दर तीनशे रुपये झाले असून, मजुरांना शेतशिवारात घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय करावी लागत असल्याने मजुरीचा दर गगनाला भिडत आहे. यामुळे शेती श्वाश्वत नसल्याचे येथील शेतकरी सांगतात.