शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

देवाचे विखरण येथे द्वारकाधीश यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:05 IST

पावसाचे सावट : व्यासायिकांची उडतेय तारांबळ

मालपूर: शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण येथे दिडशे वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा उत्सवाला शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. यावर्षी पावसाचे संकट उभे राहिल्यामुळे यात्रेत विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांची तारांबळ उडतांना दिसून येत असून भाविकांचीही भंबेरी उडत आहे.येथे दोंडाईचा धुळे रस्त्यालगत द्वारकाधीस मंदिर असून येथे भगवान विष्णूची स्वयंमभु खोदकामात सापडलेली मुर्ती असल्याचे गावकरी सांगतात. त्या मुर्तीची तत्कालीन परिस्थितीत विधीवत स्थापना करुन तेव्हा पासून म्हणजे दिडशे वर्षाची परंपरा आहे. परंपरागत कार्तिकी एकादशीच्या दिवशी यात्रा भरत असून धुळे जिल्हासह खान्देशात ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेपासुन खऱ्या अर्थाने खान्देशात यात्राना सुरुवात होत असल्याचे गावकरी सांगतात.या यात्रेत दुरदुरवरुन भाविक नवस फेडण्यासाठी दाखल होत असतात. तर परिसरातील नागरिक संसार उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी आजही गर्दी करतांना दिसून येतात. मात्र यावर्षी परतीच्या व चक्रीवादळ पावसाचे सावट कायम असून तसेच ७ नोव्हेंबर रोजी पावसाने हजेरी लावल्यामुळे विक्रेते व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडतांना दिसून आली. यामुळे व्यावसायिकांमध्ये चांगली नाराजी दिसून आली.खेळणी विकणारे विक्रेते, दरवर्षी यात्रेत येणारे हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत. सुमारे आठ दिवस या यात्रेची येथे वर्दळ सुरू असते. यात दोन दिवस दुरवरुन मनोरंजनासाठी तमाशा फड दाखल होतात. तसेच करमणुकीसाठी पालख्या विविध खेळांच्या कसरतींचे प्रकार देखील या यात्रेत पाहावयास मिळत असल्याने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत असल्याचे दिसून येते.यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थित ध्वज पूजन देखील झाले. यानंतर भजन गायनाने उत्सवास प्रारंभ झाला. कार्तिकी एकादशी निमित्ताने नामसंकिर्तन सप्ताह श्रीमद भागवत पारायण, किर्तन, प्रवचने, पालखी सोहळा आदींचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे