शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अफवांवर विश्वास ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:11 IST

जिल्हाधिकारी : धुळे शहरात ३१ मेपर्यंत कायम आहे लॉकडाउन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या आदेशात तूर्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर विशेषत: व्हाट्सअ‍ॅपवर फिरणाऱ्या खोट्या, निराधार संदेशांकडे लक्ष देवू नये़ संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करीत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून धुळे महानगरपालिका हद्दीत ३१ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यातून काही अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.मात्र, बुधवारपासून व्हाट्सअ‍ॅपवर सवलती मिळणार असल्याचा संदेश फिरत आहे. तो संपूर्ण खोटा व निराधार आहे. असा कोणताही निर्णय धुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. ३१ मे नंतर नंतर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे योग्य ते निर्णय घेऊन जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील़ असे बदल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृतरित्या विविध माध्यमातून प्रसिद्धीसाठी देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे