नगरपालिका निवडणुकीसाठी दोंडाईचा महाविकास आघाडीची स्थापना करणार- देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST2021-03-21T04:35:37+5:302021-03-21T04:35:37+5:30

येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, प्रदीप वाणी, गुलाब सोनवणे, नाना ...

Dondai's Maha Vikas Aghadi to be formed for municipal elections: Deshmukh | नगरपालिका निवडणुकीसाठी दोंडाईचा महाविकास आघाडीची स्थापना करणार- देशमुख

नगरपालिका निवडणुकीसाठी दोंडाईचा महाविकास आघाडीची स्थापना करणार- देशमुख

येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, प्रदीप वाणी, गुलाब सोनवणे, नाना मराठे व भूपेंद्र धनगर, ॲडव्होकेट प्रमोद मराठे, रईस बागवान, कय्युम पठाण, गिरधारी रामरख्या, राजेंद्र देशमुख, रवी पाटील, दिनेश चोळके, महेंद्र पाटील, दिलीप पाटील, नंदू सोनवणे, प्रतीक महाले आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने नगरपालिका सत्तेत असताना बरीच विकास कामे केली. तापी नदी पाणीपुरवठा, एलइडी दिवे, राजपथ, नगरपालिका कार्यालय, जलकुंभ, फुले मार्केट, शहरात ३८०० घरकुले, विविध रस्ते केले; परंतु गेल्या पाच वर्षांत भाजपकडे नगरपालिकेची सत्ता असून, नागरी सुविधा नाहीत, एकही नवीन काम केले नाही.

दोंडाईचा शहराचा विकास होण्यासाठी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, छोट्या पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे .आगामी निवडणूक दोंडाईचा महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Dondai's Maha Vikas Aghadi to be formed for municipal elections: Deshmukh