शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीची माहिती जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:42 IST

वंचित बहुजन आघाडी : प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

धुळे : लॉकडाऊन काळात राज्यात घडलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांची काय चौकशी केली याची माहिती द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे़ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे़वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणीचे राज्य असल्याचा गवगवा देशात आहे़ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा या राज्यातील जनतेवर आहे़ असे असतानाही या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत राज्यात जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या़ त्यामुळे महाराष्ट्राची लौकीक मात्र धुळीस मिळाला आहे़पुणे, अहमदनगर, बीड, नागपूर व राज्यातील इतर अत्याचार प्रवण क्षेत्रात विशेष न्यायालये सुरू करावी, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १५ नुसार अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांच्या गुन्ह्यातील इतर सर्व प्रकरणातील तक्रारदारांच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकील नियुक्त करावे, प्रत्येक जिल्ह्यात सामाजिकदृष्ट्या जागरुक पोलीस निरीक्षकांची ओळख करुन घ्यावी आणि सर्व जातीय अत्याचारांची चौकशी या अधिकाऱ्यांच्या मार्फत करावी, पीसीआर आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक काद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता आणि देखरेख समितीची बैठक घ्यावी आदी मागण्या निवेदनात केले आहेत़निवेदनावर गौतम पारेराव, राज चव्हाण, राजदीप आगळे, नामदेव येळवे, प्रा़ मोतीलाल सोनवणे, विजय पाटील, योगेश जगताप, अ‍ॅड़ चक्षुपाल बोरसे, शंकर खरात, नितीन वाघ, भाऊसाहेब शिरसाठ, जितेंद्र साळवे, दिपक पाटील, नविन देवरे, विशाल केदार, अ‍ॅड़ संतोष केदार, निलेश अहिरे, सागर मोहिते, गौतम बोरसे, प्रमोद सोनवणे आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे