धुळ्याचे पोलीस अधीक्षक कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:25 IST2020-09-14T17:24:58+5:302020-09-14T17:25:53+5:30

प्रकृति स्थिर : खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Dhule Superintendent of Police Corona Positive | धुळ्याचे पोलीस अधीक्षक कोरोना पॉझिटिव्ह

धुळ्याचे पोलीस अधीक्षक कोरोना पॉझिटिव्ह

धुळे : धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित हे स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर मालेगाव रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ त्यांची प्रकृति उत्तम असल्याची माहिती त्यांनी स्वत: ‘लोकमत’शी बोलताना दिली़
पोलीस अधीक्षक पंडित यांची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृति अस्वस्थ होती़ त्यांनी स्वत:च्या आरोग्याची तपासणी करुन घेतल्यामुळे त्यांचा अहवाल हा रविवारी पॉझिटिव्ह आला़ त्यांनी त्यांच्यासोबत असलेला बॉडीगार्ड आणि वाहन चालक यांचीही तपासणी करुन घेतली़ सुदैवाने ते दोघेही निगेटिव्ह आले आहेत़ दरम्यान, चिन्मय पंडित यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृति उत्तम आहे़ डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत़

Web Title: Dhule Superintendent of Police Corona Positive

टॅग्स :Dhuleधुळे