शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात दहावीसाठी ३२ हजार विद्यार्थी प्रविष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:44 IST

जिल्ह्यात ६३ केंद्र, सहा भरारी पथकांची राहणार नजर, केंद्रावर बैठे पथक राहणार

आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यातयेणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवार ३ मार्चपासून सुरूवात होत आहे. इयत्ता दहावीसाठी जिल्ह्यातून ३१ हजार ८३६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. जिल्ह्यातील ६३ केंद्रावर परीक्षा होणार आहे.इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधित होणार आहे. जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर आजपासून परीक्षा सुरू होईल. यामध्ये धुळे शहरामध्ये १३, धुळे ग्रामीणमध्ये १७, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात नऊ व शिंदखेडा तालुक्यात ११ अशा एकूण ६३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.३१ हजार विद्यार्थीदहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३१ हजार ८३६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत.यात धुळे शहरातून ७हजार ८११, धुळे ग्रामीणमधून ७ हजार ३०६, साक्री तालुक्यातून ६ हजार ७६५, शिरपूर तालुक्यातून ५ हजार १९८ तर शिंदखेडा तालुक्यातून ४ हजार ७५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.दरम्यान गेल्यावर्षी तर दहावीसाठी २९ हजार ७१५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. गेल्यावर्षाच्या तुलनेने यावर्षी २ हजार १२१ विद्यार्थी जास्त आहेत.सहा भरारी पथकांची नियुक्तीपरीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळातर्फे सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायटच्या प्राचार्या तसेच डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या व प्रभारी उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.परीक्षा केंद्रावर बैठे पथकजिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांचे बैठे पथक राहणार आहे.दरम्यान संबंधित विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख हे ज्या तालुक्यात कार्यरत आहे, त्या तालुक्यात त्यांना नियुक्त करण्यात येऊ नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात काही अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र असून, त्याठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही अधिकाºयांनी दिल्या आहेत.प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर व ग्रामीणसाठी ३ , साक्री, शिंदखेडा तालुक्यासाठी दोन, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, व्यिवस्था करण्यात आलेली आली आहे.कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण