मालपुरात विकास कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST2021-06-11T04:24:51+5:302021-06-11T04:24:51+5:30

१५ व्या वित्त आयोगातून ५० टक्के बंधित व ५० टक्के अबंधित निधीमधून ही कामे मार्गी लागत असल्याचे येथील ...

Development work started in Malpur | मालपुरात विकास कामे सुरू

मालपुरात विकास कामे सुरू

१५ व्या वित्त आयोगातून ५० टक्के बंधित व ५० टक्के अबंधित निधीमधून ही कामे मार्गी लागत असल्याचे येथील ग्रामविकास अधिकारी एल. सी. पाटील यांनी सांगितले. यात प्रत्येकी मंजूर दोन लाख ९९ हजार कृती आराखड्यानुसार वाॅर्ड क्रमांक एक, वाॅर्ड क्रमांक सहा, संतोषी मातानगर यासह विविध भागात पेव्हर ब्लॅाक बसविण्याचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे.

याप्रमाणे हागणदारीमुक्त गावाचा दर्जा राखण्यासाठी बंधित निधीतून वाॅर्ड क्रमांक चारमधील अमरावती नदी पात्राच्या किनारी दोन लाख ९९ हजार मंजूर निधीमधून महिला शौचालयांची निर्मिती, तर वाॅर्ड क्रमांक एकमध्ये भवानी नगरात पुरुष शौचालय बांधकामदेखील सुरू आहे. या कामासाठी गटनेते महावीरसिंह रावल यांचे सहकार्य लाभले असून, लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, माजी उपसरपंच जगदीश खंडेराव, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, अरुण धनगर, तुकाराम माळी, हे कामाचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Development work started in Malpur