धुळ्यात बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना उद्ध्वस्त

By Admin | Updated: April 20, 2017 14:28 IST2017-04-20T14:28:26+5:302017-04-20T14:28:26+5:30

पारोळा रोडवरील पांझरा पोळ जवळील नाल्या लगत एका घरात सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़

Demolished fake liquor manufacturing mini factory | धुळ्यात बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना उद्ध्वस्त

धुळ्यात बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना उद्ध्वस्त

 धुळे, दि.20 : शहरातील पारोळा रोडवरील पांझरा पोळ जवळील नाल्या लगत  एका घरात सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिनेश प्रभाकर भावसार, पंकज प्रभाकर भावसार व अन्य एक जण अशा तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आह़े घटनास्थळाहुन देशी व विदेशी लेबलचा दारूसाठा, दारूच्या रिकाम्या बाटल्या, ड्रम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आह़े यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके, आझादनगरचे पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी उपस्थित होत़े याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत़े 

Web Title: Demolished fake liquor manufacturing mini factory