शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षापासून पथदिवे बंद असल्याने अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:11 IST

प्रभाग १६: श्रीराम नगरातील नागरिकांची समस्या ; नगरसेवकांचे दुर्लक्ष

धुळे : येथील मिल परिसर भागातील श्रीराम नगरात वीज वितरण कंपनीच्या पोलवर पथदिवे केवळ शोभेचा ठरत आहे़ त्यामुळे येथील रहिवाशांना तब्बल दोन वर्षापासून अंधाराचा सामना करावा लागत आहे़ मनपा व स्थानिक नगरसेवकांनी वेळीच लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे़शहरातील मिल परिसर भागातील प्रभाग क्रमांक सतरा मधील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ या परिसरातील अनेक ठिकाणी गटारीची स्वच्छता झालेली नाही़ पावसाचे पाणी रस्त्यावर येवून साचते़ त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ याच परिसरातील सार्वजनिक शौचालयाची वेळेवर स्वच्छता केली जात नाही़ त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होते़ येथील काही भाग दाटवस्तीचा आहे़ त्यामुळे वेळीच स्वच्छता होण्याची गरज असतांना होत नसल्याने नागरिकांनी व्यक्त केली आहे़ श्रीराम नगरातील एका किराणा दुकाना समोरील पोल क्र.सी.आर ८५ वरील पथदिवा दोन वर्षापासून बंद पडला आहे़ तसेच याठिकाणी पावसाचे पाणी साचते़ त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अडचणी सामोरे जावे लागते़ पथदिवा बदलविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला़ मात्र अद्याप दखल घेण्यात आलेली नाही़त्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ महापालिका तातडीने भागात सर्व्हेक्षण करून जुने पथदिवे बदलून नवीन एलईडी पथदिव्यांचा बसविण्याची मागणी होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे