दांडीबहाद्दरांची सायकल स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:02+5:302021-03-06T04:34:02+5:30

राज्यात माझी वंसुधरा अभियानाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. य अभियानाव्दारे पर्यावरणा ऱ्हास होऊ नये तसेच इंधन वाचवून नागरिकांना ...

Dandi Bahadur's bicycle ride | दांडीबहाद्दरांची सायकल स्वारी

दांडीबहाद्दरांची सायकल स्वारी

googlenewsNext

राज्यात माझी वंसुधरा अभियानाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. य अभियानाव्दारे पर्यावरणा ऱ्हास होऊ नये तसेच इंधन वाचवून नागरिकांना सायकल चालविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व धुळेकरांनी सायकल चालविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार डिसेबर महिन्यात मोठ्या उत्साहात या सायकल रॅलीत लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर मार्च महिन्यातील तिसऱ्या सायकल डे ला बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी यांनी मनपा बाहेर दुचाकी लावून कार्यालयात कामावर दाखल झाले होते.

मनपाच विभाग प्रमुख व कर्मचारी यांच्याकडून नियमांचे पालन होत नसल्याने आयुक्त अजिज शेख यांनी गुरुवारी तंबी दिली होती. त्यानुसार शुक्रवारी बळवंत रनाळकर, मनोज जोशी, राजेंद्र माईनकर, आकाश मोरे, संजय भडागे, राहुल भावसार, दिलीप देव, मोहन मराठे, चंद्रशेखर बनछोडे, दीपक गायकवाड, कैलास मासाळ आदीसह अन्य कर्मचारी घरापासून ते मनपा कार्यालयापर्यंत सायकल स्वारी करीत दाखल झाले होते.

Web Title: Dandi Bahadur's bicycle ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.