शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

शेतात दुरी खाल्ल्याने गुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:23 IST

वार ते सुट्रेपाडातील घटना : ४ गायींचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील वार ते सुट्रेपाडा रस्त्यावरील एका शेतात नागरीकांच्या गायी शेतात चरत असताना ज्वारी, बाजरीचे कोंब खाण्यात आल्याने सुमारे २०० गायींना विषबाधा तर ४ गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली़ मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या ज्वारीला पुन्हा कोंब फुटले होते़ नेमके हेच कोंब अर्थात दुरी  गायींच्या खाण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे़ या घटनेबाबत माहिती कळताच रविंद्र शेलार यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाºयांचे पथक, १५ ते २० गोसेवकांचे पथकासह बाजारातून वैद्यकीय साहित्य घेवून घटनास्थळी पोहचले. गायींना वाचविण्यासाठी दिवसभर प्रयत्नांची शिकस्त करुन या रणरणत्या उन्हात जीवन मृत्यूशी झुंज देणाºया, मदतीची वाट पाहणाºया गायींचे प्राण वाचविण्यात यश आले. परंतु चार गायींना शर्थीचे प्रयत्न अपुरे पडल्याने त्यांचा जीव वाचविण्यात यश आले नाही़ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ओढवला आहे़ याशिवाय १० ते १२ गायींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट असताना पशुपालक शेतकºयांच्या पशुधनाचे नुकसान म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आहे़ भरपाईची मागणी केली जात आहे. आलेल्या संकटांना घाबरुन शेतकºयांनी आपले गोवंश बाजारात विकू नये. काहीही मदत लागल्यास आपल्याशी जरुर संपर्क साधावा़ अपघातामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयांना मदतीचा हात देण्यासाठी कटिबध्द असून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. - रविंद्र शेलारद्वारकाधीश प्रतिष्ठान, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे