शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कापडणे येथे कोविड सेंटर सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

कापडणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कापडणे गावात कोविड सेंटर उभारण्यात यावे, यासाठी प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. ...

कापडणे : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कापडणे गावात कोविड सेंटर उभारण्यात यावे, यासाठी प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. कोविड प्रतिबंधक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कापडणे येथील गढीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ही कोविड प्रतिबंधक बैठक झाली. या बैठकीला सरपंच सोनीबाई भिल, ग्रामपंचायत सदस्य आक्काबाई भिल, जितू भिल, अंजन पाटील, महेश पाटील, हरिश पाटील, प्रवीण पाटील, कपिल बोरसे, अमोल बोरसे, मनोहर आसाराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नवल नामदेव पाटील व गावात चोवीस तास आरोग्य सेवा देणारे खासगी दवाखान्याचे डॉ. भानुदास पाटील, डॉ. सुरेश माळी, डॉ. महेंद्र भामरे, जगन्नाथ पाटील, दत्तात्रय पाटील, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

कापडणे गावात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात यावे. याठिकाणी कोविड सेंटर उभारल्यास परिसरातील धनूर, लोणकुटे, कौठळ, देवभाने येथील रुग्ण गावापासून जवळच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊ शकतील. त्यामुळे रुग्णांचे हाल कमी होतील. म्हणूनच गावात कोविड सेंटर सुरू करणे गरजेचे असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. यासाठी प्रशासनाला कापडणे ग्रामपंचायतीतर्फे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगण्यात आले.

कापडणे येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, आमदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी गावात कोरोनाचा सामना व प्रतिबंध कशाप्रकारे करण्यात यावा, याविषयी चर्चा करण्यात आली. संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली तर कोरोनाला आळा घालण्यासाठी व गावात उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.