कमखेडा फाट्यावर कापसाचा ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 11:52 IST2019-04-04T11:52:13+5:302019-04-04T11:52:38+5:30

जीवितहानी टळली : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग

Cotton truck crushed on cotton yard | कमखेडा फाट्यावर कापसाचा ट्रक पेटला

कमखेडा फाट्यावर कापसाचा ट्रक पेटला

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कमखेडा फाट्यावर कपाशी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागली़ कपाशीससह ट्रक या आगीत जळून खाक झाला़ ही घटना गुरुवारी पहाटे १२ ते साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ यात जीवितहानी झाली नाही़ 
एमएच १८ बीजी १५६७ क्रमांकाचा ट्रक मध्यप्रदेशातील सेंधव्याकडून मुंबईकडे जात होता़ कमखेडा फाट्यावर ट्रक आल्यानंतर ट्रकचे पुढचे टायर अचानक फुटले़ परिणामी ट्रकने पेट घेतला असता त्याची ठिणगी कापसावर पडली़ त्यात कापसाने पेट घेतला़ क्षणार्धात कापसासह ट्रकही जळून खाक झाला़ यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली़ यात मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़ 

Web Title: Cotton truck crushed on cotton yard