शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: संचारबंदीत बाईकवर फिरला, वाट्टेल ते बडबडला; पोलिसांनी शोधला, जबरदस्त इंगा दाखवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 19:09 IST

Coronavirus संचारबंदी असताना फिरणाऱ्याचा पोलिसांकडून समाचार

धुळे- जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना आपल्या मुलासोबत मोटारसायकलवर फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीनं स्वत:चं व्हायरल केलेल्या व्हिडीओच्या मदतीनं पोलिसांनी त्याला शोधून काढलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं कान धरुन पोलिसांची माफी मागितली. पोलिसांनी या प्रसंगाचं चित्रिकरण करुन तेदेखील त्याला व्हायरल करायला लावलं.संचारबंदी लागू असताना एक व्यक्ती त्याच्या लहान मुलासोबत दुचाकीवरुन फिरत होती. आजूबाजूच्या भागात सगळं काही बंद आहे. पण आम्ही दोघं मस्त फिरतोय. आम्हाला कोण रोखणार, असं म्हणत ही व्यक्ती दुचाकी चालवत होती. याशिवाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रिकरणदेखील करत होती. 'सगळी दुनिया बंद आहे आणि आम्ही बाप बेटे फिरतोय. आमचं साहस बघा. आम्ही केळी आणायला बाहेर पडलो होतो. सध्या आम्ही चाळीसगाव रस्त्यावरुन जात आहोत. इथे रस्त्याच्या बाजूला पोलिसदेखील आहेत. मात्र चिंता करायची नाही. आरामात फिरायचं. इतक्या सुट्ट्या वारंवार कुठे मिळतात', असं ही व्यक्ती दुचाकी चालवता चालवता म्हणत होती. आपलं नाव काल्या दादा असल्याचं तिनं व्हिडीओच्या शेवटी सांगितलं होतं.संचारबंदी लागू असताना दुचाकीवरुन फिरणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा माग काढला आणि त्याला पोलिसी हिसका दाखवला. यानंतर त्यानं कान धरुन पोलिसांची माफी मागितली. 'तो व्हिडीओ मी चुकून काढला. मी पोलिसांचा आदर करतो. मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो. मी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलंय. मी कान धरतो. मी कान धरुन माफी मागतो. मी केलेली चूक मेहेरबानी करून तुम्ही करू नका. घराबाहेर पडू नका. पोलीस २४-२४ तास आपल्यासाठी काम करताहेत. माझ्याकडून चूक झाली. ती चूक तुम्ही करू नका,' असं म्हणत त्यानं पोलिसांची माफी मागितली. पोलिसांनी हा व्हिडीओ चित्रित करत त्याला तोदेखील व्हायरल करायला सांगून अद्दल घडवली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस