शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोना सुसाट, ना कॅान्टॅक्ट ट्रेसिंग,ना आयसोलेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

शिरपूर तालुक्यात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ८०६ पर्यंत पोहचली असून त्यात ५०० रूग्णांवर उपचार केले जात आहेत़ ...

शिरपूर तालुक्यात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ८०६ पर्यंत पोहचली असून त्यात ५०० रूग्णांवर उपचार केले जात आहेत़ ८१ जणांचा बळी गेला असून ४ हजार २२५ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत़ ग्रामीण भागात २ हजार ३१ व शहरी भागात २ हजार ७७५ अशी रूग्ण संख्या आहे़ ग्रामीण भागात २५ व शहरात ५६ असे एकूण ८१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़ ग्रामीण भागात आढळून आलेले २७५ रूग्ण आपआपल्या घरीच तर ५७ रूग्णांवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत़

जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य विभागाची टिम आता कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी कमी पडू लागली आहे़ गतवर्षापेक्षा दुसºया लाटेची परिस्थिती गंभीर झाली असून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर प्रशासनाला पडला आहे़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असल्यामुळे या कारणाने आरोग्य विभागावर मोठा ताण आला आहे.

n ग्रामीण व आदिवासी भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत़ मात्र त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे ते रूग्ण दवाखान्यात दाखल होत नाही़

n घरीच ते उपचार करतात़ मात्र असे रूग्ण घरी न थांबता गाव-पाड्यावर फिरतांना दिसत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़

n बाधितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्तरीय कमिटी नियुक्ती करण्यात आली आहे़

n त्यात सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, तंटामुुक्त समितीचे अध्यक्ष,आरोग्यसेवक, यांचा समावेश असतांना देखील बाधित रूग्णांवर यांचे नियंत्रण नाही़.

गत काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे़ सकाळपासून उपजिल्हा रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत़ सध्या चाचण्यांवरही व लसीकरणावर भर देण्यात आला आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसात रूग्णसंख्या कमी होईल़

- डॉ. प्रसन्न कुळकर्णी,

तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरपूर