शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये आढळला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:25 IST

तहसीलदारांची भेट : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना धुळे तालुक्यातील नेर आणि वडणे येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ग्रामीण तहसीलदारांनी रविवारी सकाळी भेट देवून पाहणी केली़ ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या़तालुक्यातील सर्वात मोठे नेर हे गाव आहे़ दोन ते तीन महिन्यापासून कोरोना आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येत होती, कोरोनाशी लढा देत असताना इतर रोगराई बाबत ग्रामपंचायती कडून काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत होते़ गावातील ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस प्रशासन, कोरोना वारीअर्स, पोलीस पाटील, गावातील जेष्ठ नागरिक यांच्याकडूनही कोरोना आजारापासून सावध रहा असे आवाहन करण्यात येत होते़ तरीसुध्दा कोरोनाचा शिरकाव गावात झाला़ कोरोना बाधित रुग्णाचा गावात संपर्क आल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे़ रुग्ण ज्या भागात राहतो तो परिसर सील करण्यात आला़धुळे ग्रामीण तहसीलदार किशोर कदम, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, नेर मंडळाधिकारी राजेंद देवरे, कुसुंबा तलाठी एस़ जी़ सूर्यवंशी, कोतवाल नाना कोळी, सरपंच शंकरराव खलाणे, ग्रामविकास अधिकारी संजय देवरे, मनिष जोशी, लिपिक संजय वाघ, हर्षल मोरे, राकेश जाधव, साफसफाई कर्मचारी, वॉटरमन आदीनी बाधीत रुग्णाच्या परिसरात भेट दिली़ त्यानंतर तहसीलदार यांनी आवश्यक त्या सूचना करीत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले़नेर व परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरक्षित असलेल्या नेर गावात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बाधिताच्या संपर्कातील २१ व्यक्तींना धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले़ प्रतिबंधित क्षेत्रात बघ्यांनी गर्दी केली होती़ गल्लीत लाकडी दांड्या लावून रस्ता बंद करण्यात आला़ तात्काळ नेरचे सरपंच शंकरराव खलाणे यांनी दखल घेत नागरीकांनी घराच्या बाहेर निघू नये़, अशी दवंडी गावात रिक्षाद्वारे फिरविली़ कंटेन्मेंट झोनमध्ये औषधांची फवारणी करण्यात आली़ रुग्ण संपर्कातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचेही वाटप करण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे