शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बरोबरच आढळत आहेत जिल्ह्यात सारी आजाराचे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:25 IST

सध्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २७ रूग्णांवर सुरू आहे उपचार

धुळे :जिल्ह्यात कोरोना सोबतच सारीचेही रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सारी हा आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आहे. कोरोना व सारी दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत.भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड विभागातच सारीच्या रुग्णांवर देखील उपचार सुरु आहेत. कोविड विभागात एकूण ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.त्यात, १३ कोरोनाबाधित व २७ सारीचे रुग्ण आहेत. तर ७ संशयित रुग्ण असून त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सारी आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात येते.कोरोना व सारी दोन्हीही आजारांमध्ये शास घ्यायला त्रास होत असतो. त्यामुळे कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येतो. व त्या रुग्णाच्या चिंतेत आणखी भर पडते. असा रुग्ण सारी या आजाराचा असू शकतो.त्यामुळे लक्षणे दिसत असतील तर लवकर कोरोनाची चाचणी करून घ्यावी. त्यामुळे उपचारांची दिशा ठरवणे सोपे जाते. व लवकर उपचार सुरु केल्यामुळे प्रकृती गंभीर होत नाही व रुग्ण लवकर बरा होऊ शकतो असे हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अतिविशेष अधिकारी डॉ.दीपक शेजवळ यांनी सांगितले.सध्या कुणालाही श्वसनासंबंधी काही तक्रारी असल्यास आपल्याला कोरोना विषाणूची लागण तर झाली नाही ना, अशी भीती वाटते. मात्र, ही सारीची लक्षणंही असू शकतात. त्यामुळे लक्षणे जाणवत असतील तर तात्काळ कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी झाली आहे.मात्र पुढील आठवडयात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे