कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला, जिल्ह्याचा एकूण जन्मदर घसरला; धुळे शहरातील जन्मदरात मात्र वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:17+5:302021-05-18T04:37:17+5:30

एकूण जिल्ह्याचा विचार केल्यास २०१८ मध्ये १६ हजार ३७० बालकांचा जन्म झाला होता. २०१९ मध्ये १७ हजार ८५४, तर ...

The Corona epidemic prolonged the cradle, dropping the district's overall birth rate; However, the birth rate in Dhule city has increased | कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला, जिल्ह्याचा एकूण जन्मदर घसरला; धुळे शहरातील जन्मदरात मात्र वाढ

कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला, जिल्ह्याचा एकूण जन्मदर घसरला; धुळे शहरातील जन्मदरात मात्र वाढ

Next

एकूण जिल्ह्याचा विचार केल्यास २०१८ मध्ये १६ हजार ३७० बालकांचा जन्म झाला होता. २०१९ मध्ये १७ हजार ८५४, तर २०२० मध्ये १४ हजार ८७२ बालकांचा जम झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० यावर्षी जन्माला आलेल्या बालकांची संख्या कमी आहे. मागीलवर्षी कोरोनामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू झाले; पण इतर व्याधींमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. कारण २०१९ मध्ये जिल्ह्यात १० हजार ३४९ मृत्यू झाले होते, तर २०२० मध्ये ९ हजार १२५ मृत्यू झाले आहेत.

धुळे शहरात मात्र लॉकडाऊनच्या काळात जन्मदर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ व २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अधिक मुले जन्माला आली आहेत. २०१९ या वर्षभरात धुळे शहरात एकूण ७ हजार ६७७ मुले जन्माला आली होती; तर २०२० मध्ये ८ हजार ४३० बालकांचा जन्म झाला आहे.

लग्नाची संख्याही घटली -

कोरोनाकाळात जिल्ह्याचा जन्मदर घसरला आहे. धुळे शहरातील जन्मदरात वाढ झाली आहे. मात्र धुळे शहरात झालेल्या विवाहांची संख्या कमी झाली आहे. २०२० मध्ये धुळे शहरात केवळ ३९५ विवाह झाल्याची नोंद महानगर पालिकेकडे आहे. जिल्ह्यात एकूण किती विवाह झाले, त्याची आकडेवारी मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. मागीलवर्षी लॉकडाऊन व निर्बंधांमुळे विवाह कमी झाले आहेत.

जन्मदरात झाली घसरण -

जिल्ह्यात मागीलवर्षी जन्मदरात घसरण झाली आहे. २०१९ मध्ये १७ हजार ८५४ बालकांचा जन्म झाला होता, तर २०२० यावर्षी कोरोना काळात १४ हजार ८७२ बालकांचा जन्म झाला आहे.

२०१८

जन्म - १६३७०

मृत्यू - ८३५६

२०१९

जन्म - १७८५४

मृत्यू - १०३४९

२०२०

जन्म - १४८७२

मृत्यू - ९१२५

Web Title: The Corona epidemic prolonged the cradle, dropping the district's overall birth rate; However, the birth rate in Dhule city has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.