शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 22:03 IST

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा गाैरव

धुळे : जीत फाऊंडेशन नवी दिल्ली आणि धुळे महानगरपालिका क्षयरोग केंद्रातर्फे असोसिएशन ऑफ फिजिशियन यांचा सन्मानचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला. क्षयरोग अर्थात टीबीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. क्षयरुग्णांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी क्षयरुग्णांची नोंद शासनाच्या निक्षय पोर्टल व महापालिकेकडे कळविणे बंधनकारक केले आहे. शहरातील खासगी रुग्णालय यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती देण्याबाबत शहर क्षयरोग केंद्रामार्फत वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. सन २०२० मध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित केले होते. याबाबतीत असोसिएशन ऑफ फिजिशियन धुळे संघटनेने तसेच सर्व डाॅक्टरांनी क्षयरुग्णांची माहिती आरोग्य विभागाला देण्यासाठी उत्कृष्ट सहकार्य केले. संघटनेचे सचिव डाॅ. संदीप भावसार यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन संघटनेच्या कार्याचा गाैरव केला. खासगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यापुढे देखील आरोग्य विभागाला सहकार्य करेल आणि क्षयरोग उच्चाटनासाठी सक्रिय सहभाग नोंदवेल, अशी ग्वाही डाॅ. भावसार यांनी दिली. यावेळी क्षयरोग अधिकारी डाॅ. जे. सी. पाटील, डीपीएस शशिकांत कुवर, पीपीएम समन्वयक प्रीती कुलकर्णी, जीत फाऊंडेशनचे अधिकारी मनोहर दुसाणे आदी उपस्थित होते.कमी वयाच्या तरुणांमध्ये देखील क्षयरोगाचे रुग्ण आढळून आल्याची उदाहरणे आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे