शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची पदे भरण्याचा ठराव

By admin | Updated: May 29, 2014 16:09 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार पर्यावरण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी महाविद्यालयांनी शिक्षकांच्या पद भरतीसाठी राज्य सरकारकडे त्वरित प्रस्ताव पाठवावेत.

जळगाव : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार पर्यावरण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी महाविद्यालयांनी शिक्षकांच्या पद भरतीसाठी राज्य सरकारकडे त्वरित प्रस्ताव पाठवावेत. तोपर्यंत तासिका तत्त्वावर किंवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची पदे भरावीत असा ठराव येथे पारित करण्यात आला.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवारी विद्या परिषदेची बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रा. सुधीर मेश्राम होते. प्रा. डी. जी. हुंडीवाले, कुलसचिव ए. एम. महाजन व सदस्य उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्याशाखांमध्ये पदवीस्तरावर पर्यावरणाचा अभ्यासक्रम लागू करावा असे आदेश देण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पर्यावरण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी, याबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन दिवसांपूर्वीच परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...तरच मिळणार प्रस्तावांना मान्यता ज्या महाविद्यालयांनी प्राचार्य, शिक्षक, ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण या पदांची पूर्तता व पायाभूत सुविधा असतील त्याच महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठीच्या संलग्नीकरण, नूतनीकरण आणि नैसर्गिक विस्ताराच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा सर्वानुमते निर्णय बैठकीत घेण्यात आला. महाविद्यालयांच्या संलग्नीकरणावर चर्चा बैठकीत कला, वाणिज्य, विज्ञान व समाजकार्य, ललित, कला, व्यवस्थापनशास्त्र, शिक्षणशास्त्र आदी महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. संलग्नीकरणासाठी ज्या महाविद्यालयांचे प्रस्ताव येतात. त्या महाविद्यालयांना स्थानिक चौकशी समिती भेट दिल्यानंतर संबंधित महाविद्यालयांच्या अहवालांमध्ये त्रुटी दर्शविण्यात आली असताना महाविद्यालयांतर्फे काही अटींवर मान्यता दिली जावी अशा शिफारशी केल्या जातात. स्थानिक चौकशी समितींच्या अहवालाची छाननी करून विशेष समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींचा पुन्हा नव्याने विचार विनिमय करून ज्या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक, शिक्षण आदी पदे भरली गेलेली असतील त्याच महाविद्यालयांना मान्यता दिली जावी, अन्यथा या महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. इन्फोबॉक्स पंडितअण्णा अभियांत्रिकी महाविद्यालयाची संलग्नता रद्द प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना परीक्षेचे साहित्य उपलब्ध क रून न दिल्यामुळे पाळधी येथील पंडित अण्णा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील संलग्नता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळीस महाविद्यालयात शिक्षक उपलब्ध नसल्याने परीक्षा घेण्यात आली नाही, असा अहवाल परीक्षकांनी दिल्यानंतर विद्यापीठ कायद्यानुसार या महाविद्यालयाची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.