शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बंद पाण्याचे आवर्तन पूर्ववत सुरू

By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST

पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा प्रकल्पातील ३० मेपासून आवर्तन पूर्ववत सुरू करण्याचे अभियंत्यांनी आदेश दिले.

धुळे : पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आवर्तन २९ मेस अचानक बंद झाले. यासंदर्भात कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी बचाव संघर्ष समितीने आवर्तने पूर्ववत सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांची भेट घेतली. त्यानुसार ३० मेपासून आवर्तन पूर्ववत सुरू करण्याचे अभियंत्यांनी आदेश दिले. अक्कलपाडा धरणातील पाणी खरीप हंगामासाठी सैयदनगर कालव्याद्वारे मिळावे यासाठी संघर्ष समितीने पाटबंधारे विभागास सूचित केले होते. रब्बी हंगामात गारपिटीने नेर परिसरातील नेर, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, भदाणे, लोहगड, लोणखेडी येथील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले होते. अक्कलपाडा धरणात पुरेसा जलसाठा असल्यामुळे खरीप हंगामासाठी पाण्याचे दोन आवर्तन मिळावे, अशी मागणी समितीने पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार २७ मे रोजी पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले. त्यानुसार सदर कालव्याच्या लाभदायक क्षेत्रातील शेतकर्‍यांनी कपाशी लागवड, मका पेरणी व इतर मशागतीसाठी सुरुवात केली. परंतु पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्व सूचना न देता २९ मे रोजी कालव्याचे पाणी बंद केले. त्यामुळे कपाशी लागवड केलेले शेतकरी व इतर पिक पेरणी केलेल्या शेतकर्‍यांचे बी-बियाणे व खते यासाठी खर्च केलेला असताना पाणी बंद केल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. समितीचे अध्यक्ष दिलीप बिरारी, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ व सचिव प्रदीप देसले व शेतकर्‍यांनी कुणाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ यांची भेट घेतली. त्यांनी कालव्याचे आवर्तन ३० मे रोजी पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिलेत. यामुळे भदाणे, नेर, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराणे, कुसुंबा, चौगाव या गावातील जवळजवळ १५०० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.