शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची काळजी घेत शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 20:59 IST

विखरण येथे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची भेट : विद्यार्थी संख्या व बैठक व्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण प्रक्रिया सुरु ठेवा अशा सूचना शालेय पोषण आहार अधीक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश रणदिवे यांनी दिल्या.शिरपूर तालुक्यातील विखरण येथील साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश रणदिवे यांनी भेट दिली़त्यावेळी शिक्षकांशी संवाद करतांना ते बोलत होते.शाळेच्या खोल्या किती? व्यवस्था कशी? सॅनेटराईज व्यवस्था यांचे नियोजन बघून शिक्षकांना मार्गदर्शन केले. इयता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करताना विद्यार्थी संख्या व बैठक व्यवस्था याचा आढावा घेतला. एका वर्गात २० ते २५ या प्रमाणे विद्यार्थी बैठक व्यवस्था करण्यास सांगून शासनाच्या ११ पानांच्या निर्णयाचे वाचन करण्यात आले.आरोग्य सेतू अ‍ॅप सक्तीने डाऊनलोड करण्यास सांगितले. सोशल डिस्टंनचे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ करणे, पालकांशी संवाद साधा तसेच वेळोवेळी शासनाच्या आदेशांचे पालन करण्याविषयी सूचना दिल्या. लॉकडाऊन कालावधीतही इयत्ता ५ वी च्या वर्गात ८४ अ‍ॅडमिशन केल्याबद्दल कौतुक केले. शाळेतील स्वच्छतागृह, ग्रंथालय, जलव्यवस्था, पोषण आहार गृह, शिक्षकदालन, प्रयोगशाळा, आयनॉक्स डिजीटल रुम, कार्यालय याची पाहणी करुन आवश्यक सूचना दिल्या. शाळेच्या आवारात रणदिवे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक महेंद्र सनेर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख एम.एस.सुर्यवंशी, पर्यवेक्षक अजय पाटील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येत असले तरी शाळा कधी सुरू होणार याची उत्सुकता आहे.

टॅग्स :Dhuleधुळे