शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी ४०० ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

धुळे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे ग्रामीण भागात प्रत्येकी १०० या प्रमाणे ऑक्सिजनयुक्त ...

धुळे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे ग्रामीण भागात प्रत्येकी १०० या प्रमाणे ऑक्सिजनयुक्त बेड निर्मितीच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. नागरिकांनी ‘कोविड- १९’ ची लक्षणे दिसताच जवळच्या रुग्णालयात तपासणी करून शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यादव यांनी आज धुळे शहरातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महागनरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर २७ ते ३० मार्च रोजीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर आज दुपारी जिल्हाधिकारी यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करून आढावा घेतला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार २७ ते ३० मार्चपर्यंत निर्बंध घोषित करण्यात आले आहेत. या निर्बंधांना धुळेकर नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यादव यांनी धुळेकर नागरिकांचे आभार मानले असून यापुढेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. शिरपूर, साक्री, शिंदखेडा आणि धुळे ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी १०० ऑक्सिजनयुक्त बेड निर्मितीच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. ते युध्दपातळीवर उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी आवश्यक निधी, मनुष्यबळाच्या भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पुढील महिन्यातील परिस्थिती विचारात घेऊन जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय आजही १०० ऑक्सिजनयुक्त बेड शिल्लक आहेत. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेडची कुठेही कमतरता नाही.

महानगरपालिकेने ऑक्सिजनयुक्त आणखी १०० बेड तयार करावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे. हे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेडची कमतरता भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांनी कोरोना विषाणूची वेळेत चाचणी करून रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की अनेक रुग्ण सुरवातीला घरगुती उपचार करताना दिसून येत आहेत. त्यामुळे दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येताच रॅपिड अँटिजेन चाचणी किंवा आरटीपीसीआर चाचणी करून तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे. जेणेकरून वेळेत उपचार होऊन जीवितहानी टाळण्यास मदत होईल. नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे. नियमितपणे मास्क वापरावा. सोशल डिस्टन्स पाळावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.