धुळयात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:59 AM2018-09-10T11:59:39+5:302018-09-10T12:01:51+5:30

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

Composite response to 'Bharat Bandh' in Dhule | धुळयात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

धुळयात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे-काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतर्फे गांधी पुतळयाजवळ आंदोलन-भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद- इंधन दरवाढीचा नोंदविला निशेष

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला धुळयात संमिश्र  प्रतिसाद मिळाला़ महात्मा गांधी पुतळयाजवळ काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, डाव्या आघाडीचाही पाठिंबा मिळाला़
देशभरात इंधनाच्या दराचा भडका झाला असून दिवसेंदिवस दर वाढतच आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे़ त्यामुळे इंधन दराच्या विरोधात काँग्रेसतर्फे आज भारत बंद पुकारण्यात आला आहे़ सकाळपासून आग्रारोडवरील मुख्य बाजारपेठेसह वाडीभोकर रोड, साक्रीरोड या भागातील दुकाने बंद होती़ परंतु दहा वाजेनंतर दुकाने उघडण्यास सुरूवात झाली़ एकूणच बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले़ शाळा, महाविद्यालयेही सुरळीत सुरू होती़ काँग्रेसतर्फे महात्मा गांधी पुतळयाजवळ इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार डी़एस़ अहिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, रणजित भोसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, प्रसाद देशमुख, गिरीश कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते़ 


 

Web Title: Composite response to 'Bharat Bandh' in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.