शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST

खाजगी रुग्णालयातील मोजक्या बेडसाठी मोजावे लागतील पैसे लोकमत न्यूज नेटवर्क धुळे - जिल्ह्यातील काेरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली ...

खाजगी रुग्णालयातील मोजक्या बेडसाठी मोजावे लागतील पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे - जिल्ह्यातील काेरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दररोज सरासरी चारशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. धुळे शहरातील खासगी रुग्णालये यामुळे फुल्ल झाली असून, कोरोना रुग्णांसाठीचे मोजकेच बेड खासगी रुग्णालयांत उपलब्ध आहेत. तेथे दाखल होण्यासाठी रुग्णांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. याचवेळी शासकीय रुग्णालयात मात्र पाचशेपेक्षा अधिक बेड रिकामे आहेत. घरीच अलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे शासकीय कोविड केंद्रात बेड उपलब्ध आहेत.

धुळे शहरातील खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांसाठी एकूण ३८० बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी सध्या केवळ १४ बेड रिकामे आहेत. एकूण ३६६ रुग्ण खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. शहरातील शासकीय कोविड रुग्णालय व कोविड केअर केंद्रात एकूण ८७० बेड असून, सध्या याठिकाणी ३०५ रुग्ण दाखल आहेत तर ५६५ बेड रिकामे आहेत. अडीच हजारांपेक्षा जास्त बाधित रुग्ण गृह अलगीकरणात असल्याने अधिक बेड उपलब्ध आहेत. बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. दररोज शहरातील २००पेक्षा जास्त जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र, त्यात लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अशा रुग्णांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अलगीकरणातील रुग्णांची संख्या जास्त असल्याने शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत. दरम्यान, गंभीर असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

राखीव बेड परस्पर वाढवले -

कोविड रुग्णांसाठीच्या राखीव बेडमध्ये काही खासगी रुग्णालयांनी परस्पर वाढ केली असून, त्याची माहिती प्रशासनाला दिलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासन लवकरच खासगी रुग्णालयांची बैठक बोलावणार असून, त्यात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.