शहरातील चाळीसगावरोड व शंभर फूट रोड क्रॉसिंगवर वर्षभरात अनेक अपघात झाले. त्यात काहींचा जीव गेला. या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. गेल्या आठवड्यात एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गतिराेधक टाकण्याची मागणी केली. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तसेच गतिरोधक टाकण्याची सूचना केली. त्यानुसार गतिरोधकांचे काम सुरू झाले. हे काम सुरू झाल्यावर अन्य काही ठिकाणी गतिरोधक टाकावे, अशी मागणी झाली. त्यानुसार आमदार फारुख शाह यांनी पाहणी करून जेथे गरज आहे तेथे गतिरोधक टाकण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शाह, सलीम शाह, परवेज शाह, शहराध्यक्ष नुरा शेख, आसिफ शाह, नीलेश काटे, सागर पाटील, डॉ. बापू पवार, डॉ. दीपश्री नाईक, आकाश बिऱ्हाडे उपस्थित होते.
चाळीसगाव, शंभर फूट क्रॉसिंगवर गतिरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST
शहरातील चाळीसगावरोड व शंभर फूट रोड क्रॉसिंगवर वर्षभरात अनेक अपघात झाले. त्यात काहींचा जीव गेला. या चौकात मोठ्या प्रमाणावर ...
चाळीसगाव, शंभर फूट क्रॉसिंगवर गतिरोधक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}