येथील भगवा मारोती चौक परिसरातील राम मंदिरात पादुका पूजन, अभिषेक, पूजा पाठ, आरती करून दुपारी १२ वाजता श्रीरामाच्या नावाचा गजर करण्यात आला. या वेळी कथा, पारंपरिक भजन व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. ग्राम पुरोहित हर्षवर्धन पुराणिक यांच्या हस्ते अभिषेक, पूजा विधी करण्यात आला. गावावरून कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे प्रभू रामचंद्रांना या वेळी घालण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}तसेच बस स्थानकावरील महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरातदेखील पारंपरिक सर्व कार्यक्रम रद्द करीत पूजा पाठ, आरती करून रामनवमी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.