शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हाडाखेड तपासणी नाक्याजवळ सेंधवाकडून येणारी गाडी (क्र.पीबी-०३-बीएफ-६५८८) मध्ये कत्तलीकरिता जनावरे जात असल्याची माहिती सांगवी ...

बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हाडाखेड तपासणी नाक्याजवळ सेंधवाकडून येणारी गाडी (क्र.पीबी-०३-बीएफ-६५८८) मध्ये कत्तलीकरिता जनावरे जात असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या गाडीला पकडले़ मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात गाईंची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या आयशरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून १२ गाईंची सुटका केली तर राजस्थान येथील चालक साजित जाकीर हुसेन (वय २१, रा. रावतसर वार्ड क्रमांक ७, ता.रावतसर जि. हनुमानगड (राजस्थान) यास ताब्यात घेतले आहे.

सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी वाहनाची ताडपत्री उघडून बघितले असता वाहनात निर्दयपणे आखूड दोरीने बांधलेल्या परिस्थितीत १२ गाई मिळून आल्या. गायींची सुटका करून गो-शाळेत पाठविण्यात आले. त्यात २० हजार रुपयाप्रमाणे १२ गाईंची किंमत २ लाख ४० हजार रुपये तर आयशर गाडी १० लाख रुपये असा एकूण १२ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ चालकाला ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात पोकाॅ शामसिंग काड्या पावरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, हवालदार पाटील, राजीवे गीते, संजय जाधव यांनी केली़