शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वाझे वापरत असलेली कार धुळ्याचीच, पण ती फेब्रुवारीमध्ये विकली गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 15:30 IST

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण : कारचे आधीचे मालक सारांश भावसार यांनी दिलेली माहिती

धुळे : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण चांगलेच गाजत आहे. एनआयएने जप्त केलेली सचिन वाझे वापरत असलेली कार ही धुळ्याची निघाली आहे. वस्तुत: ही कार फेब्रुवारी २०२१ मध्येच विकली गेली आहे. या कारचा माझा काही संबंध राहिलेला नाही, अशी माहिती त्या कारचे आधीचे मालक सारांश भावसार यांनी दिली. दरम्यान, तपासाचा भाग असल्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही अशी भूमिका प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी व्यक्त केली़सचिन वाझे यांच्याकडून तपासासाठी एनआयए यांच्या पथकाने ताब्यात घेतलेली एमएच १८ बीआर ९०९५ क्रमांकाची मर्सिडीज कार ही धुळे पासिंगची असल्याचे उघडकीस आले आहे. ही कार धुळ्यातील उद्योजक सारांश भावसार यांची होती. त्यांनी ही कार आपल्या आईच्या नावाने २०१९ मध्ये खरेदी केली होती. त्यानंतर भावसार यांनी ही कार फेब्रुवारी २०२१ मध्ये ‘कार २४’ या आॅनलाईन कंपनीला विकली होती. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काही संबंध राहिलेला नाही अशी भूमिका कारचे आधीचे मालक सारांश भावसार यांनी व्यक्त केली. याप्रकरणी जर काही माहिती तपास यंत्रणेला पाहिजे तर मी निश्चित सहकार्य करेल असेही भावसार यांनी सांगितले.अद्याप विचारणा नाही : आरटीओमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत जी कार सापडली आहे ती धुळ्याची असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरुन चौकशी सुरु असल्याने यासंदर्भात अधिक माहिती देवू शकत नाही. वरिष्ठ पातळीवरुन अथवा पोलिसांकडून विचारणा झाली तरच त्यांना माहिती देता येईल. तुर्ततरी तपासाचा भाग असल्यामुळे कारसंदर्भातील अधिकृत माहिती देता येऊ शकत नाही़ अशी भूमिका प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़

टॅग्स :Dhuleधुळे