शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कार-दुचाकी अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:18 PM

सोनगीरनजीक डांगुर्णे गावाजवळील घटना

धुळे : भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यात गंभीर जखमी झाल्याने एक जण ठार झाल्याची घटना सोनगीरनजीक डांगुर्णे गावाजवळ २१ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. कार चालकाविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमएच १८ बीजी ०६४९ क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एमएच १८ बीजी ८४५९ क्रमांकाच्या दुचाकीला ती धडकली. या अपघातामुळे दुचाकीवरील दोघे जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. धुळे तालुक्यातील सोनगीर ते दोंडाईचा दरम्यान डांगुर्णे गावाच्या अलीकडे ही अपघाताची घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चेतन रामसिंग गिरासे (२५, रा. सोनशेलू ता. शिंदखेडा) यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चेतन हा रस्त्यावरच विव्हळत पडला होता. त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या प्रकरणी नरेंद्र भगवानसिंग गिरासे (३८, रा. सोनशेलू ता. शिंदखेडा) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी रोजी पहाटे दीड वाजता फिर्याद दाखल केल्याने कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वळवी घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे