दहावीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क परत कधी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:21+5:302021-05-18T04:37:21+5:30

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. ...

Canceled 10th exam, when will the exam fee be refunded | दहावीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क परत कधी करणार

दहावीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क परत कधी करणार

Next

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. गतवर्षापेक्षा यावर्षी कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने पहिली ते ११वीपर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द केलेल्या आहेत. सीबीएसईपाठोपाठ परीक्षा मंडळानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या ३६८ एवढी असून, यामध्ये एकूण २९ हजार ५८५ विद्यार्थी प्रविष्ठ होते. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने, सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ४१५ एवढे शुल्क भरले होते. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे.

दहावीचा अभ्यास केला होता. त्यासाठी परीक्षा शुल्कही भरले हाेते; मात्र आता परीक्षाच रद्द झाल्याने बोर्डाने लवकर परीक्षा फी परत करावी

नितीन जोशी,

विद्यार्थी

दहावीची परीक्षाच घेतली नाही, तर बोर्डाने प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क परत करावे, याचा त्यांना हातभार लागेल.

- सोनम ब्रम्हे

विद्यार्थिनी

दहावीच्या परीक्षेसाठी शुल्क भरलेले होते; पण यावर्षी परीक्षाच रद्द ‌झालेली आहे. परीक्षा नाही, तर शुल्क वापस करावे

- देविदास पाटील,

विद्यार्थी

Web Title: Canceled 10th exam, when will the exam fee be refunded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.