शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानंतर धुळे मध्यवर्ती बसस्थानकात मध्य प्रदेशच्या बसेसला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:28 IST

वाहतुकीची कोंडी होत असल्याने, देवपूर बसस्थानकातून गाड्या सोडण्याचे दिले होते आदेश

आॅनलाइन लोकमतधुळे : वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन येथील मध्यवर्ती बसस्थानकात मध्यप्रदेश परिवहनच्या बसगाड्यांना नोव्हेंबर २०१८ पासून प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र मुंबई येथील सेंट्रल कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर पुन्हा मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्यात आलेला आहे.धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानात दररोज ११०० बसगाड्या येतात व जातात. तसेच दिवाळी व इतर सणाच्या काळात बस फेऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असते. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. परिणामी रस्त्यावर बसगाड्यांची रांग लागत असातत. या स्थानकात होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी इंदूर, भोपाळसह मध्यप्रदेशच्या इतर भागात जाणाºया तसेच इंदूरहून धुळे, पुणे, शिर्डी, नाशिक, या गावांकडे जाणाºया महाराष्टÑ व मध्यप्रदेशच्या बसेस धुळे मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी देवपूर बसस्थानकातून सुटतील असे आदेश विभाग नियंत्रकांनी काढले होते.मध्यवर्ती बसस्थानकात गाडी आणण्यास मध्यप्रदेशच्या बसेसला परवानगी नसल्याने, या गाड्या स्थानकाबाहेर उभ्या राहत होत्या. त्या बसेसचे चालक-वाहक आगारात येऊन प्रवाशी घेऊन जात होते. या बसेस रसत्यावर उभ्या राहत असल्याने, वाहतुकीचीही कोंडी होत होती. मध्यंतरी मध्यप्रदेशची बस मध्यवर्ती स्थानकात आणल्याच्या कारणावरून येथील कर्मचाऱ्यांशी वादही झाला होता.दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश मिळत नसल्याने, तेथील संघटनेने याबाबत मुंबईच्या सेंट्रल कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीबद्दल सेंट्रल कार्यालयाने धुळे विभागाच्या अधिकाºयांना कुठलीही विचारणा न करता, तसेच बसस्थानकात होणारी कोंडी लक्षात न घेता, मध्यप्रदेशच्या बसगाड्यांनाही मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा आदेश दिला असल्याचे समोर आले आहे. आम्हाला कुठलेही स्पष्टीकरण करण्याची संधीच मिळाली नाही, असे धुळे विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे.दरम्यान २७ आॅक्टोबरपासून मध्यप्रदेशच्या बसगाड्या मध्यवर्ती बसस्थानकात पूर्ववत येऊ लागल्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे