संसाराचे ओझे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:03+5:302021-04-21T04:36:03+5:30

उन्हाची तीव्रता वाढली धुळे : उन्हाची तीव्रता वाढली असून, एप्रिल हीटचा तडाखा जाणवतो आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके असह्य ...

The burden of the world ... | संसाराचे ओझे...

संसाराचे ओझे...

उन्हाची तीव्रता वाढली

धुळे : उन्हाची तीव्रता वाढली असून, एप्रिल हीटचा तडाखा जाणवतो आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके असह्य होत आहेत. तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर गेल्याने दुपारी शहरामध्ये शुकशुकाट दिसतो; परंतु सायंकाळी पुन्हा गर्दी होते.

अपघाताचा धोका

धुळे : साक्री रोडवरील कुमारनगर भागात डीपीजवळ कचरा टाकला जात असल्याने तेथे गुरांचा वावर वाढला आहे. ही मोकाट गुरे प्रसंगी रस्त्यावरदेखील येतात. रहदारीचा रस्ता असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

सरकारी भिंती रंगविल्या

धुळे : शहरातील विविध शासकीय कार्यालये, संस्था, शाळांच्या संरक्षक भिंती रंगवून जाहिराती केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या जाहिराती करण्यास निर्बंध घालणे अत्यंत आवश्यक आहे.

बँकांच्या बाहेर रांगा

धुळे : धुळे शहरातील बँकांच्या बाहेर रांगा कायम आहेत. कोरोनामुळे एकावेळी तीन ते पाच ग्राहकांना प्रवेश असल्याने बँकांच्या बाहेर लांबलचक रांगा लागत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यामुळे संसर्ग वाढू शकतो.

Web Title: The burden of the world ...