बिलाडी-नगाव रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:53+5:302021-05-07T04:37:53+5:30

बिलाडी-नगाव रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव, बापू खलाणे, पं. स. सदस्य, रामदास पाटील, ...

Bhumi Pujan of Biladi-Nagaon road | बिलाडी-नगाव रस्त्याचे भूमिपूजन

बिलाडी-नगाव रस्त्याचे भूमिपूजन

Next

बिलाडी-नगाव रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी कृषी सभापती अरविंद जाधव, बापू खलाणे, पं. स. सदस्य, रामदास पाटील, सुभाष पाटील, सरपंच वामन पाटील उपस्थित होते.

खा. सुभाष भामरे म्हणाले की, राम भदाणे यांची धुळे तालुक्यातील विकास कामांसाठी नेहमी धडपड, अथक प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या या कामांमुळे निश्चितच ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी प्रा. अरविंद जाधव, बापू खलाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य राम भदाणे यांनी केले. ते म्हणाले, बिलाडी-नगाव रस्त्याच्या कामासाठी अंदाजित ८४ लक्ष रुपये मंजूर आहेत. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण राहणार आहे. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी नगाव व बिलाडी गावातील ग्रामस्थांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.

Web Title: Bhumi Pujan of Biladi-Nagaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.